वीपूजनाची सांगता देवीला खण व साडी अर्पण करून, म्हणजेच देवीची ओटी भरून करायची असते. देवीला खण व साडी अर्पण करणे, म्हणजे देवीच्या निर्गुण तत्त्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय. सर्व पंचोपचार पूजाविधी हे ईश्वराच्या निर्गुण रूपाशी निगडित आहेत. देवीला खण व साडी अर्पण करतांना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने, त्या आधी केलेल्या पंचोपचार विधींतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्त्वाला साडी व खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास मदत होते.
देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती ?
अ. `देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.
आ. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.
इ. देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. यामुळे सगुण देवीतत्त्व जागृत होण्यास मदत होते.
ई. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.
उ. त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा.

No comments:
Post a Comment