Monday, October 3, 2011

देवीची ओटी भरण्याचे महत्त्व काय ?


वीपूजनाची सांगता देवीला खण व साडी अर्पण करून, म्हणजेच देवीची ओटी भरून करायची असते. देवीला खण व साडी अर्पण करणे, म्हणजे देवीच्या निर्गुण तत्त्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय. सर्व पंचोपचार पूजाविधी हे ईश्‍वराच्या निर्गुण रूपाशी निगडित आहेत. देवीला खण व साडी अर्पण करतांना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने, त्या आधी केलेल्या पंचोपचार विधींतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्त्वाला साडी व खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास मदत होते.

देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती ?
अ. `देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.
आ. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.
इ. देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. यामुळे सगुण देवीतत्त्व जागृत होण्यास मदत होते.
ई. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.
उ. त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा.

शक्ती उपासनेचे नवरात्र


नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना करण्याचे दिवस होय. जगात कोणतेही नैतिक मूल्य केवळ चांगले असल्यामुळे टिकत नाही, तर त्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी त्याच्या मागे संत-महंतांची तपस्या असणे आवश्यक आहे. तपश्चर्येला यश मिळते ही गोष्ट सत्याच्या उपासकांना विसरून चालणार नाही. 

अश्विन महिन्यात येणार्‍या या नवरात्रोत्सवाची एक प्रसिद्ध कथा आहे. महिषासुर नावाचा एक अत्यंत क्रूर राक्षस होता. त्याने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर त्रिलोकात अत्याचाराचे थैमान घातले होते. त्याच्या अत्याचारामुळे सर्वजण दु:खी झाले होते. या अत्याचारापासून मुक्ती मिळविण्यासाठी सर्व देवांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेशाची आराधना केली. 

देवांची प्रार्थना ऐकून आद्यदेव महिषासुरावर अत्यंत क्रोधीत झाले आणि त्यांच्या पुण्य प्रकोपाने एक दैवी शक्ती प्रकट झाली. सर्व देवांनी त्या शक्तीचा जय-जयकार करून तिचे पूजन केले. तिला आपल्या दिव्य शस्त्रांनी सजविले. या देवीने सलग नऊ दिवस युद्ध करून महिषासुराचा वध केला. नंतर दैवी शक्तीची पुनर्स्थापना करून देवांना अभय दिले. ती दैवी शक्ती म्हणजे दुसरे कुणीही नसून आपली जगदंबा माता आहे.

नवरात्रीच्या दिवसात वाईट विचारांवर विजय मिळविला पाहिजे. महिषासुराचे मायाजाळ ओळखून त्याच्या राक्षसी कृत्यापासून मुक्त होण्यासाठी दैवी शक्तीची आराधना करणे आवश्यक आहे. संपूर्ण नऊ दिवस अखंड दीपज्योती लावून देवी जगदंबेची पूजा करून तिची शक्ती प्राप्त करण्याचे दिवस म्हणजे नवरात्र होय. 

राक्षस हा मोठमोठे दात, नख, लांबलचक केस, मोठे डोळे असलेला भयानक प्राणी असतो अशी आपली कल्पना आहे. वास्तविक राक्षस म्हणजे 'असुषु रमन्तेइति असुरा:' प्राण्यांत रमणारा, सुखात राहणारा आणि महिष म्हणजे रेडा. रेड्यासारखी वृत्ती असणारा राक्षस म्हणजे महिषासुर होय. रेडा नेहमी आपले सुख पाहत असतो. समाजात आजही रेड्यासारखी प्रवृत्ती वाढताना दिसून येते. त्याचा परिणाम म्हणजे समाज स्वार्थी आणि भावनाशून्य बनला आहे. समाजात व्यक्तीवाद आणि स्वार्थीपणाची अमर्याद‍ीत वाढ झाली असून तो महिषासुराच्या रूपाने नांदत आहे. या मह‍िषासुराला बांधून ठेवण्यासाठी देवीकडे शक्ती मागण्यासाठी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. 

वेदांत शक्तीच्या उपासनेला विशेष महत्त्व दिले आहे. महाभारताचे प्रत्येक पान बलोपासना आणि शौर्यपूजेने भरलेले आहे. महाभारतात पांडवांना धार्मिक मूल्य टिकवून ठेवायचे असेल तर केवळ हात जोडून बसून चालणार नाही तर शक्तीची उपासना करावी लागेल असा सल्ला महर्षी व्यासाने दिला होता. अर्जुनाला दिव्य अस्त्र प्राप्त करण्यासाठी त्यांनीच स्वर्गात जाण्याचे मार्गदर्शन केले होते. 

अनंत काळापासून दैवी विचारांवर राक्षसी विचार आक्रमण करत आले आहेत. या विचारावर संकट आले तेव्हा तेव्हा देवांनी भगवंताकडे शक्ती मागून राक्षसी प्रवृत्तीचा सर्वनाश केला. केवळ चांगले विचार असून चालत नाही तर त्या विचारांचे रक्षण करणे गरजेचे असल्यामुळे शक्ती उपासना करणे आवश्यक आहे. म्हणून आपण आळस झटकून शक्तीच्या उपासनेला सुरवात केली पाहिजे. 'संघे शक्ती: कलै युगे' हे लक्षात ठेवून नवरात्रीच्या दिवसात दैवी विचारांच्या लोकांचे संघटन करणे आवश्यक आहे. 

या संघटनेच्या मुख्य स्थानी जगदंबा असेल आणि तिच्या भक्तीने आपल्याला शक्ती प्राप्त होईल, हे सुचित करण्यासाठी नवरात्रीच्या दिवसात गरबा आणि रासलीलेच्या रूपात देवी भोवताली फेर धरला जातो. देवीजवळ फिरता-फिरता आपण हे मागितले पाहिजे की, 'हे देवी! आम्हाला सदसदवि‍वेक बुद्धी दे. आमच्या संघटनेत अहंकार, द्वेष येत आहे. त्याला तू नष्ट कर.' देवी जगदंबेची ही उपासना नवरात्रीत सुरू होते. परंतु केवळ नऊ दिवसासाठी मर्यादीत न ठेवता कायम ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.


Sunday, October 2, 2011

दैनिक लोकमत


गाव करील ते राव काय करील?


     स्थानिक पुढा-यांच्या किंवा शासनाच्या भरवशावर बसले तर विकासकामे पार पडण्यास वर्षानुवर्षे लागतात. सर्वसाधारणपणे छोट्या-छोट्या गावातील ग्रामस्थांना येणारा हा नित्याचा अनुभव. परंतु नेवासा तालुक्यातील घोडेगाव मात्र याला अपवाद ठरले आहे. या गावातील ग्रामस्थांनी (विशेषत: तरुण वर्गाने) नुकत्याच हाती घेतलेल्या सत्कार्यामुळे 'गाव करील ते राव काय करील?' असेच सध्या म्हणावे लागत आहे.


     जागृत देवस्थान 'घोडेश्वरी देवी' हे घोडेगावचे ग्रामदैवत. या देवीचे एक पुरातनकालीन हेमाडपंथी मंदिर गावात आहे. दरवर्षी शारदीय नवरात्रोत्सवात आणि चैत्र कृष्ण पंचमीला तेथे देवीची मोठी यात्रा भरते. या काळात लाखो रुपयांची उलाढाल होते. राजकीय दृष्टीकोनातूनही घोडेगावला नेवासा तालुक्यात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे उपआवार, जनावरांचा आठवडे बाजार (प्रामुख्याने म्हैस आणि बैलांचा), जवळच असलेले शनीशिंगणापूर, ही घोडेगावची मुख्य ओळख. पण कित्येक वर्षे उलटूनही या मंदिराच्या विकासाला लागलेले ग्रहण मात्र सुटले नाही.
     गावात आणि तालुक्यात अनेकदा राजकीय सत्तांतर झाले. दर निवडणुकीला गावच्या विकासासोबत मंदिराच्या विकासाचाही सूर आळविला गेला, परंतु प्रत्यक्षात मात्र काहीच झाले नाही. त्यामुळे मंदिराच्या विकासासाठी गावातील तरुणाईनेच पुढाकार घेतला आणि १५ फेब्रुवारीला प्रत्यक्ष कृतीला सुरुवात झाली. मात्र हे सत्कार्य करीत असताना वर्षानुवर्षे आश्वासनांचे गाजर दाखविणा-या पुढारी किंवा शासनापुढे या तरुणाईने हात पसरले नाहीत. स्वकष्टातून आलेल्या मिळकती मधील 'खारीचा वाटा' बाजूला काढून त्यातून हे सत्कार्य तडीस न्यायचा या तरुणाईचा मानस आहे.
     'घोडेश्वरी देवी मंदिर विकास समिती'च्या माध्यमातून या मंदिर परिसराचा विकास सध्या सुरु आहे. मंदिराभोवती संरक्षक भिंत, आतील परिसराचे सुशोभिकरण, बगीचा, वाहनतळ आणि प्रवेशद्वार असे या कामाचे स्वरूप आहे. त्यासाठी कमीत कमी सुमारे २० ते २२ लाख रुपयांचा (अंदाजे) खर्च अपेक्षित आहे. गावातील कुठलेही धार्मिक कार्य (मग ते यात्रोत्सव असो किंवा नवरात्रोत्सव) असो, वर्गणी आलीच आणि घोडेगावात तर वर्गणीला तोटाच नाही. एकट्या आठवडे बाजारात लाखो रुपयांची वर्गणी गोळा होते. गावकरी या मार्गाने गेले असते तर मंदिराचे काम केंव्हाच पूर्णत्वास गेले असते.
     पण घोडेगावकरांनी या मंदिराचा विकास करायचा, मात्र त्यासाठी 'बाहेरच्या' लोकांपुढे हात पसरायचे नाही, मदतीसाठी कोणावर सक्ती करायची नाही, असे ठरविले. ज्याची इच्छा असेल तो मदत देईल, या भावनेतून काम सुरु झाले. मंदिराच्या विकासकामात आपापला 'खारीचा वाटा' टाकण्यासाठी इतर ग्रामस्थही मग पुढे आले. कुणी रोख रकमेच्या स्वरुपात, कुणी बांधकाम साहित्याच्या स्वरुपात मदत दिली आणि सत्कार्यात सहभागी झाले.
     बांधकामासाठी लागणारे दगड, विटा, वाळू, सिमेंट, स्टील, ग्रील, रंग, खिळे, असे साहित्य गोळा झाले. ज्या गावक-यांनी अशी मदत दिली, त्यांची नावे रोज सायंकाळी ध्वनीक्षेपकावरून जाहीर केली जातात. कुणाला 'गुप्तदान' करायचे असेल तर त्याचेही नाव 'गुप्त' देणगीदारांच्या यादीत नोंदविले जाते. ज्यांना यापैकी काही शक्य झाले नाही ते प्रत्यक्ष श्रमदान करायला पुढे आले. एखाद्या दिवशी कामावर कुणी नसले तर गावातील 'तरुणाई' स्वत: उन्हात राबते. त्यामुळे या कामाने आता वेग घेतला असून संरक्षक भिंतीचे काम आता प्रगतीपथावर आहे.
     'घोडेश्वरी देवी'चा यात्रोत्सव २ दिवसांवर येऊन ठेपला आहे. तसे पाहता २० लाख रुपयांची रक्कम काही थोडी नाही. मात्र ग्रामदेवतेवर निष्ठा ठेवून सत्कार्यासाठी पुढे आलेली 'तरुणाई' देखील आपल्या निश्चयावर तितकीच ठाम आहे. लोकसेवकांच्या स्थानिक निधीतून किंवा शासकीय योजनेतून पार पडलेल्या विकासकामांचे श्रेय घेणारी मंडळी आपण पाहतो. परंतु घोडेगावची झपाटलेली तरुणाई मात्र वेगळीच. त्यांना प्रसिद्धी अजिबात नकोय.
     या 'तरुणाई'सोबत संवाद साधला असता, ''आम्हाला एकाच ध्यासाने झपाटलंय, ते म्हणजे ग्रामदेवतेच्या मंदिराचे सुशोभिकरण आणि विकास. त्याकरिता शासकीय योजनेची खैरात किंवा पुढा-यांचा पैसा आम्हाला नको. 'आई घोडेश्वरी'चा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. मनात अढळ आत्मविश्वास आहे आणि हे स्वप्न साकार करण्याची ताकद देखील आमच्या मनगटात आहे.'' असे ते सांगतात. आणखी काय हवे. सत्कार्यासाठी जर गाव एकत्र आले तर अशक्य काय आहे. एकीकडे आजकालच्या युवकांना विकासाचे घेणे-देणे नाही, असा टोमणा मारला जातो. परंतु घोडेगावच्या तरुणांनी मात्र आपल्या कृतीतून परिसरात आणि इतर गावांपुढे नवा आदर्श उभा केला आहे.


Saturday, October 1, 2011

!! घोडेश्वरी !!


नगर औरंगाबादरोड वर घोडेगाव हे एक छोटे गाव .
गावच इतिहास फार जुना आहे.
साधारणतः १००० वर्षांपूर्वीची गोष्ट असावी त्यावेळी गावाचे नाव होते निपाणी वडगाव , गावात पाणी नसल्याने त्यावेळी सर्व साधारण पणे नामकरण  झाले असावे . कारण त्यावेळी गावात पाणी नव्हते
  गावाला पिण्यासाठी पाणी नसल्याने  सर्व गावकऱ्यांनी  पिण्यासाठी विहीर खांदण्याचे ठरवले .
एक चांगला मुहूर्त पाहूनकामच शुभारंभ ही झाला ,  त्याकाळी आजच्या सारखी यंत्र सामुग्री नसल्याने टिकाव , फावडे , खोरे,  घमेले या साधनाचाच वापर होत आसे अत्यंत कष्टाने  १० परस विहीर गावकऱ्यांनी खान्दली  तरी विहिरीला एक थेब ही पाणी लागले नाही गावकरी निराश झाले त्यामुळे  गावकऱ्यांनी विहिरीच नाद सोडून दिला . काही लोकांनी दुसरीकडे स्थलांतरही  केले.

  काही दिवसानंतर गावाच्या पूर्वेला असणाऱ्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात राहणाऱ्या एका  साधूने  गावाकर्याना  त्या मंदीराजवळ विहीर खांदण्याचे सुचवले आणि तेथे नक्की पाणी लागेल असे सुचवले ,त्या नंतर  एका शुभ मुहूर्तावर  तुळजाभवानी ची पूजा करून  विहीर खांदण्यास  सुरुवात केली , पाच -सहा पारस विहीर खांदली तरी पाण्याचा थेब लागेना त्यामुळे या ही विहिरीचे काम व्यर्थ जाते कि काय आसे गावाकार्याना वाटू लागले ?
               त्या दिवशी मंगळवारच दिवस होता , विहीर खांदण्याचे  काम चालू असतानाच सहा परसाच्या  पुढे आचानक चमत्कार  झाला ,  विहीर खणात असतानाच एक आश्वरूपी  म्हणजे घोड्याचा आकार असलेली दगडी मुर्ती सापडली , सर्वाना आश्चर्याचा धक्काच बसला  कारण इतक्या खोलवर ही मुर्ती आलीच कशी हा प्रश्न सर्वांना  भिडसावत होता सर्व गावकऱ्यांनी ही मुर्ती कडून एका जागेवर ठेवली
             अंधार पडल्यानंतर सर्व लोक आपापल्या घरी निघुन गेले त्या रात्री तत्कालीन  गावाच्या पाटलाच्या स्वप्नात  देवी आली  आणि `` मी घोडेश्वरी देवी आहे माझी  प्राणप्रतिष्टा तुळजाभवानी मातेच्या  मंदिरात करा , यापुढे गावाला कधीच पाणी कमी पडणार नाही आसे म्हणून  देवी अंतर्धान  पावली .
           सकाळी  पाटलांनी स्वप्नात पाहिलेला सर्व चमत्कार चावडीवर गावकऱ्यांना सांगितला सर्व गावकऱ्याना  खूप आनंद वाटला , एक शुभ मुहूर्त पाहून  त्या आश्वरूपी देवीच्या मुर्तीची  प्रती स्थापना पुरातन तुळजाभवानी मंदिरत करण्यात  केली.   त्या दिवशी मोठी यात्राही भरली त्याद्नंतर  सर्व गावकरी त्या साधू महाराजांकडे आले आणि म्हणाले महाराज आपण सांगितल्या प्रमाणे आम्ही या
मंदिराजवळ विहीर खणली सहा पारस  विहीर झाली पण एक थेंबही पाणी लागले नाही ,बाबांनी आणखी एक पारस विहीर खांदण्यास  सांगितले .
             दुसऱ्या दिवशी देवीची पूजा करून  गावकऱ्यांनी विहीर खांद्ण्यास प्रारंभ केला आणि पाचच फुट खाली खणले आसतानांच  अचानक  विहिरीला भरपूर पाणी लागले पाणी पिण्यास गोड  होते तसेच या विहिरीच्या पाण्याने अनेक त्वचारोग बरे होतात आशी अनेकांची श्रद्धा आहे . त्यामुळे गावकरी खुप आनंदी झाले .

   विहिरीतून प्रगट झालेल्या  देवीची मुर्ती ही आश्वरुपी , घोड्याच्या आकाराची आसल्याने घोडेश्वरी नाव पडले  आणि याच घोडेश्वरी मातेच्या कृपेने  गावाला खूप काही पाणी मिळाले व गावाच्या पाण्याच प्रश्न सुटला त्यामुळे गावाचे निपाणी वडगाव  या नावाचा अपभ्रंश होऊन  घोडेगाव हे नाव रूढ झाले
 याच देवीच्या करुणे हा भाग सुजलाम सुफलाम झाला , बागायत झाला  आणि बाजारही खुप मोठा भरू लागला आणि आत्ता देशभरात ही प्रसिद्ध झाला आहे . .
  मूर्तीचे वैशिष्ट्य  मुर्ती स्वयंभु आसून  कुणीही न घडवता आपोआपच तयार झाली आहे , मंदिरचे बांधकाम हेमाडपंथी आसून बांधकाम केव्हा झाले कुणालाही सांगता येत नाही मंदिर हेमाडपंथी   आसून मोठ - मोठ्या दगडात मंदिराचे काम झाले आहे .
देवीचे व गावाचे वैशिष्ट्य
*********************
प्राचीन रुढे परंपरे नुसार गावात तेल्याचा  घाना चालत नाही .
कुंभाराचे चाक चालत नाही
तसेच गावात कुणी घोडे पळत नाही ,
स्थानिक सोनार   व्यवसाय गावात चालत नाही .
कुठलाही गुंड , समाज विरोधक  काम करणारा ( दादा ) ३ वर्ष पुढे टिकत नाही .
 यात्रेत गोंधळ करणारा , मारामाऱ्या करणारा  पुढची यात्रा बघत नाही , हा इतिहास आहे .


 आत्ता नुकतेच गावातील काही उमद्या युवकांनी एकत्र येउन  मंदिर जीर्नौधाराचे  काम चालू केले आहे गाव ही मोठ्या प्रेमाने त्यांची पाठीशी उभे राहिले आहे , साथ दिली आहे. काम्पौनडचे  काम पूर्ण होत आले आहे , सभामंडप  एक बाजूचे काम पूर्ण झाले आहे आणि दुसऱ्या बाजूचे काम प्रगती पथावर आहे . आपणही या कार्यास आर्थिक मद्दत करू शकता









Thursday, September 29, 2011

सरस्वती पूजन


नवरात्र महोत्सवात अश्‍विन शुद्ध नवमीला "सरस्वती पूजन' करण्याचा प्रघात आहे.
देवी सरस्वतीचे वर्णन ऋषी असे करतात-

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्‍वेतपद्मासना।। 
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। 
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा।। 

भारतीय वाङ्‌मयात "सरस्वतीयाचा अर्थ दोन प्रकारे आहेएक नदी म्हणून व दुसरा देवी-देवता म्हणून!

सरस्वती नदीची उत्पत्ती 
प्राचीन वाङ्‌मयात सरस्वती ही ब्रह्मदेवांची कन्या म्हणून उल्लेख आहेतिला एकदा पुरुरवा या राजाने पाहिलेतिचे अप्रतिम सौंदर्य पाहून राजा अत्यंत मोहित झालापुरुरव्याने त्याची प्रिया उर्वशीतिच्या मध्यस्थीने या सरस्वतीला घरी बोलविलेत्या वेळी पुरुरव्याला न राहविल्यामुळे सरस्वतीचा कौमार्यभंग केलाहे जेव्हा ब्रह्मदेवांना समजले तेव्हा ते रागावले व दोघांना शाप दिलासरस्वतीला ते म्हणाले, ""यापुढे भूतलावर तू नदी म्हणून वाहत राहशील.'' त्याप्रमाणे ती "सरस्वती नदीम्हणून वाहू लागली.

पद्मपुराणात सृष्टीखंडात सरस्वती नदीची उत्पत्ती सांगितली आहेती अशी -
एकदा भूतलावर वडवाग्नीने प्रचंड असा प्रलय मांडला होतादेव-दानव व सर्व पृथ्वी होरपळून निघत होतीम्हणून ऋषीमंडळींनी ब्रह्मदेवांना यापासून वाचवण्याची प्रार्थना केली.
तेव्हा ब्रह्मदेवांनी या अग्नीला एका पात्रात कोंडून ठेवले व ते पात्र सागराकडे घेऊन जाण्यास कन्या सरस्वतीस सांगितलेकन्या सरस्वती हा अग्नी घेऊन जाण्यास तयार नव्हतीपरंतु पित्याची आज्ञा म्हणून हे अग्निपात्र घेऊन जाऊ लागलीपरंतु अग्नीचे तेज तिला सहन न झाल्यामुळे ती त्यामुळे जलरूप झालीतिचे नाव "सरस्वती नदीहोय.
ही सरस्वती नदी अत्यंत वेगवान अशी नदी असूनवरुणाच्या मुखात पडते. (ऋग्वेद 6.11.63) हिची निर्मिती प्रजापतीकडून झालेली आहेही नदी पर्वतावर उगम पावून सागराला मिळतेपरंतु द्वापारयुगात तिचे जल आटले व राजस्थान वाळवंटात ती अडकून पडली आहेपरंतु पुढे प्रयाग क्षेत्रात ती गंगा-यमुना या नद्यांच्या संगमात गुप्त रूपाने येऊन मिळाली असल्याने या संगमाला "त्रिवेणी संगमम्हणतात.

सरस्वती देवी म्हणून उत्पत्ती 
ब्रह्मदेवांनी सबंध सृष्टी निर्माण केलीत्याबरोबर प्रजोत्पत्तीही केली.ब्रह्मदेवांच्या वामांगापासून शतरूपा राणी व उजव्या अंगापासून स्वायंभुवमनु निर्माण झालेया शतरूपा राणीनंतर सावित्रीब्राह्मणी व सरस्वती या स्त्रिया निर्माण झाल्यायातील सरस्वती ही ब्रह्मदेवांची पत्नी झाली
देवी भागवतात देवीची उत्पत्ती सांगताना सांगितलेकी राधा-राणीच्या जिव्हाग्रापासून या देवीचा जन्म झाला.

ही जेव्हा सगुणरूपात प्रकट झालीतेव्हा तिने श्रीकृष्णाला वरण्याची इच्छा प्रदर्शित केलीपरंतु भगवान श्रीकृष्णाला तिच्याबरोबर राहणे योग्य वाटले नाहीसबब त्याने तिला शाश्‍वत रूप दाखवले व तिचे समाधान करून तिला परब्रह्मस्वरूपी भगवंताला शरण जाण्यास सांगितलेतसेच भगवंताच्या आज्ञेने ती ज्ञानीमहात्मेनिष्ठावान प्रेमळ भक्त यांच्या जिव्हाग्रभागी राहू लागली
पद्मपुराणात पुष्कर माहात्म्यात असे सांगितले आहे, ""एकदा पृथ्वीवर दीर्घ काळ दुष्काळ पडला होतात्याचे निवारण करण्यासाठी ब्रह्मदेवांनी यज्ञ करण्याचे ठरविलेपरंतु यज्ञ कोठे करावाहे ठरविताना त्यांनी स्वर्गातून एक पद्म (कमळभूमीवर टाकलेते पद्म ज्या ठिकाणी पडले ते पुष्करतीर्थ म्हणून प्रसिद्ध पावलेसबंध भारत देशात पुष्कर क्षेत्री फक्त ब्रह्मदेवांचे मंदिर आहे.
या पवित्र क्षेत्रात ब्रह्मदेवांनी यज्ञ सुरू करताना त्यांची पत्नी सरस्वती हिला आवाहन केलेपरंतु ती यज्ञकार्यात वेळेवर येऊ शकली नाहीपण यज्ञकर्माचा मुहूर्त टळू नये म्हणून ब्रह्मदेवांनी इंद्राला दुसरी स्त्री आणण्यास सांगितले. (कारण यज्ञकर्म हे सपत्नीकांनी व पत्नीबरोबरच करावेहा दंडक आहेतेव्हा इंद्राने एक गोप स्त्री आणून गाईच्या मुखातून तिला काढून तिची शुद्धी केली(एक वेदोक्तपुराणोक्त विधी आहेआणि ती ब्रह्मदेवाजवळ बसविलीती"गायत्रीम्हणून प्रसिद्ध पावली.

यज्ञकर्म सुरू झाले आणि काही वेळाने आपल्या सख्यांबरोबर सरस्वती देवी आपल्या लवाजम्यानिशी मंडपात आलीआपल्या जागेवर दुसरी स्त्री पाहून ती रागावली व तिने सर्वांना शाप दिलातो असा

1) ब्रह्मदेवाची पूजा लोक वर्षातून एकदा करतील
2) इंद्राला कुठल्यातरी परक्‍या देशात शृंखलाबद्ध होऊन पडावे लागेल
3) विष्णूने यात सहकार्य केले म्हणून त्याला मानवयोनीत गुराखी व्हावे लागेल (श्रीकृष्ण झाले). 
4) रुद्रांचा शूरपणा नष्ट होईल.
5) अग्नी सर्वभक्षक बनेल
6) ब्राह्मण उपाध्याय यापुढे फक्त दक्षिणा मिळविण्याच्या दृष्टीने धार्मिक विधीयज्ञकर्म करतीलनंतर लक्ष्मीदेवीने तिच्याशी मध्यस्थी केली व सरस्वती देवीचा राग शांत केला.

ब्रह्मदेवाने पुष्कर तीर्थावर सरस्वतीसाठी एक सरोवर तयार केलेकाही दिवसांनी सरस्वतीलक्ष्मीगंगा यांचे तिघींचे एकमेकांशी भांडण झाले.त्यामुळे नारायण परमात्म्याने सांगितलेकी सरस्वती एक अंशरूपाने पृथ्वीवर नदी म्हणून राहील व एक अंशरूपाने ब्रह्मदेवांची पत्नी म्हणून राहील.
कलियुगाची पाच हजार वर्षे लोटली म्हणजे ती नदीचा गुप्तपणा सोडून उघडपणे वाहू लागेलत्यानंतर ब्रह्मदेवाने तिला आवाहन केलेतेव्हा ती म्हणाली, ""मला पापी लोकांचा संपर्क न व्हावा म्हणून मी गुप्त राहीन व आपली आज्ञा होता क्षणीया पुष्कर क्षेत्रात प्रकट होईन.''

तसेच लक्ष्मी व सरस्वती एकत्र नांदणार नाहीतअसे सांगितलेत्यामुळे धनवान माणूस बुद्धिमान असतोअसे नाही व बुद्धिमान माणूस धनवान होईलचअसे असू शकत नाहीकेवळ ईशकृपा व सद्‌गुण संपदेने या एकत्र नांदताना दिसतात
सरस्वती देवीचे कार्य 
ऋग्वेदात या देवीचे गुणगान असे केले आहेकी ती ब्रह्मदेवाची पत्नीसर्वांची रक्षणकर्तीअन्नपाणी पुरविणारीसर्वांना सामर्थ्यसंपन्न करणारीदान देणाऱ्यांना उत्तम वरदान देणारीधन्याला संतुष्ट करणारीयज्ञकर्मात विपुल धान्य देणारी आहेतसेच शुक्‍ल यजुर्वेदात तिचे वर्णन आले आहेया वेदात तिला इडाभारती व सरस्वती या प्रजाय देवता (नव निर्माण करणाऱ्याअसून मरुतविराटगायी या इंद्रिय शक्ती व दीर्घायुष्य देवोही प्रार्थना करतात

या सरस्वतीला वेळकाळ व कार्यानुरूप भारतीब्राह्मीपुटकारीशारदा,वागीश्‍वरीवीणा इत्यादी नावे प्राप्त झाली आहेत.
प्रामुख्याने ही सरस्वती विद्यादेवता म्हणून अवतीर्ण झाली आहेब्रह्मदेवांची आज्ञा म्हणून तिने सत्ययुग संपल्यावर त्रेतायुगाच्या प्रारंभी पवित्र व योग्य मानवाच्या जिव्हाग्रावर प्रवेश केलाया भूतलावर प्रथम तिने तमसा नदीवर एका ऋषींच्या जिव्हेवर प्रवेश केलाते ऋषी म्हणजे वाल्मीकी होतव्याधाने एका क्रौंच पक्ष्याला ठार केलेत्याची प्रिया शोक करीत असता वाल्मीकींनी त्या पक्ष्याची शुश्रूषा केलीहे करुणाजनक दृश्‍य पाहून सरस्वतीला दया आली आणि त्याचे वर्णन करण्यासाठी ऋषींच्या मुखात प्रवेश केल्याबरोबर या भूतलावर पहिले काव्य बाहेर पडले.

ते म्हणू लागले
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्‍वतीः सम। 
यत्क्रौंच मिथुनादेकमवधीः काममोहितम्‌।। 


या काव्यामुळे वाल्मीकींना आदिकवीचा मान मिळाला
ऋग्वेदात 10-32-12 मध्ये सरस्वतीचा संबंध बुद्धीशी व अमृत शब्दाबरोबर जोडला आहेकारण वेदवाङ्‌मयात "ज्ञावर्गातील काही देवता स्वीकारल्या आहेतया "ज्ञावर्गातील वाग्‌देवता म्हणून ही सरस्वती आहेया "ज्ञा'वर्गातील देवतादेवतांचेतसेच मानवाचे कार्य समृद्धी व फलोत्पादन करणाऱ्या म्हणून आहेत.
त्यामुळे मातृशक्ती म्हणून हिचे महत्त्व मानले आहेसरस्वती देवी बुद्धीला गतिमानता व तेजस्विता देत असल्याने सर्व ऋषीसाधूसंत महात्मे हिचे गुणगान करतातहीच भगवती सरस्वती भाषाकाव्यकलाअलंकार इ.गुणांची जननी म्हणून मानली आहे.

ही सरस्वती देवी हंसवाहिनी आहेनाथ महाराज तिचे वर्णन करतात


सारासार निवडी जनी। 
त्या हंसावरी हंसवाहिनी।। 


अशी ही देवता असूनसर्व वस्तुमात्रांमध्ये योग्य निवडीचे ज्ञान देणारी ही देवता आहे
सरस्वती देवीचे स्वरूप -
सरस्वती देवी ही शुभ्रकमलावर किंवा हंसावर आरूढ दिसतेहिचा वर्ण शुभ्र असून शुभ्र वस्त्र परिधान केले आहेही चतुर्भुजा असून उजव्या हातात अक्षमाला व व्याख्यानमुद्रा आहेडाव्या हातात पुस्तक व कमळ आहेकधी स्फटिक माला गळ्यात असताततर कधी वीणा हातात असतेगळ्यात यज्ञोपवीत असून अंगावर रत्नजडित अलंकार आहेतशृंगेरी मठात या वर्णनाबरोबर सरस्वतीच्या हातात मालाअमृतकुंभपोपट व हंसवाहनी असे स्वरूप स्वीकारले आहे
असे या देवीचे स्वरूप आहे
नवरात्रातील पूजन -
नवरात्र उत्सवातसरस्वतीचे म्हणून काही भागांत परंपरेनेआवाहन अष्टमीला, "पूजननवमीला, "विसर्जनदसऱ्याला करतात किंवा सप्तमी,अष्टमी व नवमी तिथीला आवाहनपूजनविसर्जन विधी करताततर काही भागांत फक्त नवमीला सरस्वतीचे पूजन करतातमहाराष्ट्रात साधारणपणे घराघरात नवमीला सरस्वती पूजनाचा विधी करतातया पूजनात ग्रंथपोथी,पुस्तक यांचे पूजन असतेतसेच मूर्ती वा फोटोचे पूजन (वर वर्णन केल्याप्रमाणेकरण्याचा प्रघात आहे
अशा सरस्वती देवीस शब्दरूपाने वंदन करू या!

सौजन्य -- सुस्मिता  जोशी

महाराष्ट्रामधील साडेतीन शक्तिपीठे


महाराष्ट्रामधील साडेतीन शक्तिपीठे

१) कोल्हापूरची महालक्ष्मी (अंबाबाई)
२) माहूरगडची रेणुका (एकविरा, यमाई)
३) तुळजापूरची भवानी
४) वणीची सप्तशृंगी
हि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे होत.
हि साडेतीन शक्तिपीठे म्हणजे ॐ काराचे सगुण रूप आहे. ॐ कार म्हणजे प्रणव म्हणजेच परमात्म्याचे साकार आणि प्रकट रूप मानले जाते. ॐ कारामध्ये सार्धत्रय (साडेतीन) मात्रा आहेत. त्याप्रमाणेच साडेतीन शक्तिपीठे क्रमशः अशी आहेत :
१) मातापूर
२) तुळजापूर
३) कोल्हापूर
४) सप्तशृंगी
'अ'कार पीठ माहूर 'उ'कार पीठ तुळजापूर 'म'कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्धमात्रा सप्तशृंगी.
सप्तश्रुंग निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून अर्धपीठ. सात शिखरांच्या समुदायास सप्त श्रुंग म्हणून ओळखले जाते. यातील एका अतियूच्च शिखरावार देवीचे मूळ स्थान आहे. पण ते ठिकाण अतिशय दुर्गम असल्यामुळे वर्षातून एकदा चैत्रपौर्णिमेला ध्वज लावण्यासाठी एकच व्यक्ती मूळ स्थानाला जाते. पुराणातील वरणनाप्रमाने ह्याच शिखरावर मार्कंडेय ऋषींनी घोर तप केले होते. त्यांच्यावर कृपा करण्यासाठी देवी इथेच प्रकट झाली होती. ते मूळ स्थान अत्युच्च शिखरावरतीच आहे. ह्या ॐकार पर्वतावर चढून जाणे आजही कठीण आहे. मांडूक्य उपनिषदानुसार साडेतीन मात्रा ॐकार स्वरूपी प्रतिक रूप या शक्तीपीठावरती साधना करणार्यांना भक्ती व मुक्ती दोन्ही बरोबरच मिळतात.
माहुरची रेणुका महाकाळी पीठ आहे. सप्तशतीच्या प्राधानिक रहस्यात वर्णन केलेल्या महाकालीच्या दहा नावात एकवीरेचे नाव आहे. एकविरा म्हणजेच रेणुका किंवा यमाई होय. कोल्हापूर महालक्ष्मीचे शक्तीपीठ आहे. तुळजा भवानी महासरस्वतीचे रूप आहे. सात मातृका अर्ध मात्रा स्वरूपी व अर्ध पीठ सप्तशृंगी आहे.
तुळजा भवानी शिवरायांची आराध्य दैवता व महाराष्ट्रातील अनेकांची कुलस्वामिनी आहे. पुराणात या देवीची तीन नावे आढळतात 'त्वरिता', 'तुरजा', ' तुळजा'. त्वरित म्हणजे शीघ्र प्रसन्ना होणारी 'त्वरिता' आणि भक्तांच्या हाके सरशी धावणारी 'तुरजा'. 'तूर' म्हणजे त्वरित + जा म्हणजे जाणारी, त्वरित धावणारी ती ' तुरजा'. ' तुरजा' या शब्दाचा अपभ्रंश 'तुळजा' झाला (र-लयोर्भेदः ).
कोल्हापूरला आद्य मातृशक्तीचे मुख्य स्थान म्हणतात. या क्षेत्राला 'महामातृका पीठ' व 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते.
श्री महालक्ष्मीच्या मंदिरातील रचना चक्रराज (श्री यंत्र) प्रमाणे सर्वतो भद्र मंडल प्रमाणे आहे. या मंदिरात पाच शिखरे व तीन मंडपे आहेत. गर्भ गृह मंडप, मध्य मंडप व गरुड मंडप हे तीन मंडप होत. प्रमुख व विशाल मंडपा मध्ये १६ x १२८ स्तंभ कलाकुसरींनी युक्त आहेत.
माहूरला मातापूर असे म्हणतात. याच क्षेत्री भगवान दत्तात्रेय नित्य भिक्षाग्रहण (भोजन) करतात. या कुंडातून, सती कुंडातून परशुरामाच्या पुत्र प्रेमापोटी,वात्सल्यापोटी देवी रेणुका प्रकट झाली. इथे केवळ देवीचा चेहराच आहे पूर्ण मूर्ती नाही, केवळ शिरोभागच आहे.
ऋग्वेदातील उषासुक्तामध्ये उशाला आदितीमुखा म्हटले आहे. हिलाच अनार्वा व दिव्या गौम्भ नावाने संबोधिले जाते. रेणुका हे देवमाता अदितीचे रूप आहे म्हणून या क्षेत्राला मूळपीठ म्हणतात. वेदात रेणुकेचा उल्लेख नाही पण महर्षी जमदग्नी याचा उल्लेख वारंवार आढळतो. जमदग्नी हा प्रत्यक्ष शिवाचा अवतार मंत्रदंष्ट्रा ब्रह्मर्षी होत. ऋग्वेदाचा दशमंडलाचा द्रष्टा तसेच, उश्मांड हवन विधीचा प्रचारक तसेच ससर्परी विद्या आणि श्राद्ध विधीचा रचयिता महर्षी जमदग्नी हे होत. महर्षी जमदग्नीचे आश्रम व रीशिकुल जिथे जिथे होत तिथे तिथे रेणुका मातेचे स्थान आहेत. तरी पण मूळ स्थान म्हणजे सती स्थान माहूर किंवा मातापूर हेच मुख्य आहे. रेणुका हि अग्नी तत्वाशी संबंधित आहे. अग्नी ज्वालावर अधिष्ठित व अग्नी ज्वालावर परीवेश्ठीत रूपाचे वर्णन सर्वत्र आढळते त्यामुळे रेणुका हि अग्नी देवता आहे. देव माता अदिती हि प्रलायाग्निवर आरूढ व अग्नीवलयांकित आहे. त्या प्रमाणे चीदग्नी अग्नी संभवा रेणुका जमदग्नी बरोबर विवाह बद्ध झाली. सूर्य व अग्नी देव तिच्या पोटी पुत्र रूपाने अवतरले. विवाहाच्या वेळी दोघांनी श्रवताग्नी व चेताग्निचे व्रत ग्रहण केले व शेवट पर्यंत ते व्रत केले. व शेवटी हि अग्नीच्या चिताग्नी मध्ये लुप्त झाली व पुन्हा अग्नी मधून प्रगटली भक्त कल्याणासाठी शाश्वत रुपात प्रतिष्ठित झाली ते क्षेत्र म्हणजे माहूर. भगवती अदिती रेणुका, मूळशक्ती, अनादी शक्ती व पराब्रःमेची महाशक्ती आहे. दशावतारा मध्ये वामन व परशुराम हे दोन अवतार ब्राह्मण कुलसंभूत अवतार आहेत. दोघांची माता अदिती व रेणुका होय. परशुरामाच्या कारणामुळे पुत्र वत्सला पृथ्वीवर सदैव अधिष्ठित रेणुका हीच होय. सर्व देवी देवता अवतार कार्य समाप्ती नंतर निजधामास गेले पण रेणुका देवी अंतर्धान पावल्यावर मातेच्या ममतेने पुन्हा पृथ्वीवर प्रगटली ती कायमचीच.

स्वतः आदीशक्ती स्वरूपिणी , पतीदेव साक्षात शिव आणि पुत्र परशुराम म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार, हा त्रिवेणी संगम. आदिशक्ती सती जाताना प्रत्यक्ष महाविष्णू(परशुराम) मंत्राग्नी देत आहेत. सृष्टी संचालक त्रिदेव दत्तात्रेय सती कर्माचे पौरोहित्य करीत आहेत असा अद्भुत प्रसंग विरळाच.
सतीच्या शरीराचे श्री विष्णूंनी सुदर्शन चक्राने तुकडे केले ते जिथे जिथे पडले ती सर्व ठिकाणे शक्तिपीठे बनली. माहूर क्षेत्री सतीचे स्तनद्वय पडले. मातृदेहा मध्ये वात्सल्य रसाचे स्थान म्हणजे स्तनद्वय किंवा पयोधर होय. या मातृत्वाच्या वात्सल्याचे मूळ ठिकाण म्हणजे पुरःस्थल म्हणजेच माहूर.
 — with Sameer Mokate and 24 others

महालक्ष्मी


देवी जगदंबेचे एक नामरूप म्हणजे महालक्ष्मी होय. या देवीला दुर्गा, महिषासुर मर्दिनी इत्यादी नावेही सांगितली आहेत. ही देवी म्हणजे विष्णुपत्नी नसून शिवपत्नी दुर्गा आहे. देवीमाहात्म्य या पौराणिक ग्रंथात या देवीची अवतारकथा सांगितली आहे, ती पुढीलप्रमाणे – एकदा देवदानवांच्या घनघोर संग्रामात दानवांचा विजय झाला. त्या दानवांचा मुख्य महिषासुर हा जगाचा स्वामी झाला व त्याला इंद्रपद मिळाले. तेव्हा पराजय झालेले सर्व देव ब्रह्मदेवाबरोबर भगवान विष्णू आणि शंकर यांच्याकडे गेले व त्यांनी आपली करूण कहाणी त्यांना सांगितली. ती ऐकून विष्णू व शंकर हे अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांच्या मुखांतून महान तेज बाहेर आले. ब्रह्मदेव, इंद्र इत्यादी सर्व देवांच्या शरीरातूनही मोठे तेज बाहेर पडले. हे सर्व तेज एकत्रित होऊन त्या दिव्य तेजातून एक स्त्रीदेवता प्रकट झाली. त्या देवतेने दानवांशी युद्ध करून महिषासुर व त्यांच्या सैन्याला ठार केले. तेव्हापासून त्या देवीला महिषासुर मर्दिनी किंवा महालक्ष्मी हे नाव पडले. या महालक्ष्मीचे दुर्गा सप्तशतीमध्ये खालील रूपध्यान वर्णन केले आहे ते असे – ‘‘हातामध्ये अक्षमाला, परशू, गदा, बाण, वज्र, कमल, धनुष्य, कुंडिका, दंड, शक्ती, खड्‌ग, चर्म, शंख, घंटा, सुधापात्र, शूल, पाश व सुदर्शनचक्र धारण करणारी प्रसन्नवदना, कमलासना व महिषासुरमर्दिनी अशा महालक्ष्मीचे मी ध्यान करतो.’’ शाक्त संप्रदायाचे अनुयायी ज्या आदिशक्तीची उपासना करतात ती महालक्ष्मीच आहे जी चतुर्भुज असून तिच्या हातात फळ, गदा, ढाल व कपाल या वस्तू असतात. तिच्या मस्तकावर सर्प, लिंग आणि योनी दाखविली आहे. चंडीकवचात वर्णन केलेल्या देवतेचे वर्णन दुर्गासप्तशतीशी मिळतेजुळते आहे. प्राचीन काळी कोलासुर नावाचा दैत्य स्त्रियांना खूप त्रास देत असे. तेव्हा सर्व स्त्रियांनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची प्रार्थना केली तेव्हा या त्रिमूर्तीने कोलासुराला ठार मारण्याचे कार्य महालक्ष्मीकडे सोपवले. महालक्ष्मीने कोलासुराला मारून जनतेला विशेषतः स्त्रियांना संकटमुक्त केले. कोलासुर म्हणजे रानडुक्कर. हे रानडुक्कर शेतीची नासधुस करते. म्हणून त्याचा नाश करून देवीने शेतीचे संरक्षण केले. म्हणून महालक्ष्मी ही समृद्धीची देवता मानली जाऊ लागली. महाराष्ट्रामध्ये महालक्ष्मीची मंदिरे कोल्हापूर, मुंबई, डहाणूजवळचे बिवळवेढे, केळशी (जि. रत्नागिरी) आडिवरे (जि. रत्नागिरी) कुडाळ व वाई तसेच गोव्यामध्ये बांदिवडे, मांद्रे, झाशी, कुंभळगड, अणहिलवाड इत्यादी ठिकाणी आहेत.

तुळजापूर ची भवानी माता


कृतयुगाच्या वेळी 'कर्दम' ऋषींची पत्नी 'अनुभूती' हिच्याबद्दल 'कुन्कुर' नावाच्या दैत्याला अभिलाषा उत्पन्न झाली. तिच्या पातिव्रत्याच्या भंग करण्याचा त्याने प्रयत्न करताच देवी पार्वती ही त्वरीत धावून आली. तिने दैत्याचा नाश केला. त्वरित धावून येणारी म्हणून ती त्वरिता किंवा मराठीत तुळजा या नावाने तुळजापूरची देवी माहीत झाली.या देवीच्या उत्पत्तीमागे अशी कथा सांगितली जाते की, कृतयुगामध्ये या भागात कर्दम ऋषींचा आश्रम होता. त्यांची पत्नी होती अनुभूती. कर्दम ऋषींच्या मृत्यूनंतर अनुभूतीला सहगमन करायचे होते. पण ती त्यावेळी गर्भवती असल्याने तिला तसे करता आले नाही. म्हणून तिने मुलगा मोठा होऊन गुरुगृही गेल्यानंतर देवीच्या तपश्चर्येला प्रारंभ केला. या तपश्चर्येच्या काळात कुकूर नावाच्या राक्षसाची नजर अनुभूतीवर पडली. त्या राक्षसापासून स्वत:ला वाचविण्यासाठी तिने देवीची प्रार्थना केली आणि अष्टभूजेच्या रुपात देवीने प्रगट होऊन तिचे रक्षण केले. तिथेच देवीने वास्तव्य केले. हेच ठिकाण तुळजापूर नावाने पुढे प्रसिध्द झाले.

नवरात्रीची आरती


नवरात्रीची आरती

आश्‍विनशुद्धपक्षी अंबा बैसलि सिंहासनी हो
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करूनी हो।।
मूलमंत्रजप करूनी भोंवते रक्षक ठेवूनी हो
ब्रह्मा विष्णू रुद्र आईचें पूजन करिती हो ।।

उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ।।

द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो
सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।।
कस्तुरीमळवट भांगी शेंदूर भरूनी हो
उदोकारें गर्जती सकल चामुंडा मिळूनी ।।उदो।।

तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो
पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळां हो ।।
कंठीची पदके कांसे पीतांबर पिवळा हो
अष्टभूजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ।।उदो।।

चतुर्थीच्या दिवशी विश्‍वव्यापक जननी हो
उपासकां पाहसी प्रसन्न अंतकरणी हो ।।
पूर्णकृपें जगन्माते मनमोहिनी हो
भक्तांच्या माऊली सूर ते येती लोटांगणी हो ।।उदो।।

पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता हो
अर्ध्यपाद्यपूजनें तुजला भवानी रतविती हो ।।
रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो
आनंदे प्रेम तें आले सद्‌भावे क्रीडतां हो ।।उदो।।

षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो
घेऊनि दिवट्या हस्तीं हर्षे गोंधळ घातला हो ।।
कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो ।।उदो।।

सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो
तेथे तूं नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो ।।
जाईजुईसेवंती पूजा रेखियली बरवी हो
भक्त संकटी पडतां झेलुनि घेता वरचेवरी ।।उदो।।

अष्टमीचे दिवशी अष्टभूजा नारायणी हो
सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो ।।
पहिलें शरण आलों तुजलागुनी हो
स्तनपान देऊनी सुखी केले अंतकरणी ।।उदो।।

नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणें हो
सप्तशतीजप होमहवनें सद्‌भक्ती करूनी हो ।।
षड्‌सअन्ने नैवेद्यासी अर्पियेली भोजनी हो
आचार्य ब्राह्मणां तृप्त केलें त्यां कृपेकरूनी हो।।उदो।।

दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो
सिंहारूढ दारुण शस्त्रे अंबे त्वां घेऊनी हो ।।
शुभनिशुंभादिक राक्षसां किती मारिसी रणी हो
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणीं हो।।उदो।।
 

सप्तशृंगी देवी


देवीची मूर्ती ८ फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिंपली आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. देवीला अकरा वार साडी लागते व चोळीला तीन खण लागतात डोक्‍यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे. कमरपट्टा, पायात तोडे, असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात.सप्तशृंग येथे वास्तव्य करणारी करणारी देवी म्हणजेच सप्तशृंगी असे मानले आहे. दंडकारण्यात राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते. ऐतिहासिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले, अशी आख्यायिका आहे. तसेच महानुभावी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला. त्या वेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय. नाथ संप्रदायातील नवनाथांना शाबरी विद्या प्रत्यक्ष देवीने दिली असेही नोंदवलेले आढळते. निवृत्तिनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस उपासना केली होती. शिवाय सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बखरींमध्ये नोंदवलेला आढळतो. देवी भागवतात देवीची देशात १०८ शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे.कोणत्याही पुरुषाकडून मरण निळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून मिळाल्यामुळे महिषासुर नावाचा राक्षस माजला होता. त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून करून इंद्राला तिथून हुसकून लावले होते. त्यामुळे तो ब्रह्मा विष्णू व महेश या त्रयींकडे मदतीची याचना करू लागला. त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली. ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. या काळात महिषासुर सप्तशृंगीच्या जवळ होता. देवीने त्याचा तेथेच वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केले अशी कथा आहे

महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ असलेली सप्तशृंगीदेवी नाशिकपासून 65किलोमीटरवरील 4800 फूट उंचावरील सप्तशृंगगडावर वसली आहेसह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील सात शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंगगड.एकीकडे खोल दरीतर दुसरीकडे छाती दडपविणारे कडे आणि यात फुललेली नाजूक हिरवाईअसा निसर्ग घेऊन येथे उभी 
ठाकलेली देवी जणू या निसर्गाच्या रौद्र रूपाशीच नाते सांगणारी आहे, असे वाटते
आदिमायेच्या या गडावर वस्ती करण्याची आख्यायिकाही तिच्या या रूपातूनच जन्माला आली आहेमातलेल्या महिषासुर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवादिकांनी देवीची याचना केली अन्‌ होमाद्वारे ती प्रकटही झालीतिचे प्रकट रूप हेच सप्तशृंगीचे होतेअसे सांगितले जातेया देवीचे महात्म्य मोठे आहे.देवी भागवतात देवीची देशात 108 शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. 
त्यांपैकी महाराष्ट्रात साडेतीन पीठे आहेतत्यांपैकी सप्तशृंगीचे अर्धे पीठ आहे.याव्यतिरिक्त अर्धे पीठ असल्याचा कोणताही उल्लेख त्यात सापडत नाहीया देवीला श्री ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात.
ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवीमहाकालीमहालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगीदेवीअसे मानले जातेनाशिकच्या तपोवनात रामसीता व लक्ष्मण वनवासासाठी आले असतायेथे येऊन गेल्याचीही आख्यायिका आहे.
देवीच्या अवताराबरोबरच मूर्तीविषयी असलेली आख्यायिकाही भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जातेएका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला.त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडलीअशीही एक दंतकथा आहे.
येथील निसर्गाचे रूप रम्य आहेडोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची आठ फूटी मूर्ती आहेतिला अठरा भुजा आहेतमूर्ती शेंदूरअर्चित असूनरक्तवर्ण आहेडोळे टपोरे व तेजस्वी आहेतसर्व हात एकमेकांना लागून आहेतसर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्रे दिली होती.
शंकराचे त्रिशूलविष्णूचे चक्रवरुणाचा शंखअग्नीचे दाहकत्ववायूचा धनुष्यबाणइंद्राचे वज्र व घंटायमाचा दंडवरुणाचा पाशदक्षप्रजापतीची स्फटिकमालाब्रह्मदेवाचे कमंडलूसूर्याची किरणेकालस्वरूपी देवीची तलवारक्षीरसागराचा हारकुंडले व कंकणविश्‍वकर्माचा तीक्ष्ण परशू व चिलखत समुद्राचा कमलाहारहिमालयाचे सिंहवाहन व रत्न आहे.
मूर्ती काहीशी झुकलेली आहेत्याबाबतची कथाही गमतीदार आहे.गडाजवळच्या दरीजवळ मार्कंडेय ऋषी तपश्‍चर्या करीत होतेत्यांची प्रार्थना देवी ऐकत होतीतेव्हापासून प्रार्थना ऐकण्यासाठी झुकलेल्या अवस्थेतच देवीची मूर्ती असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
सुमारे 472 पायऱ्या चढून गेल्यावर देवीचे दर्शन होतेचैत्र व नवरात्र असे दोन उत्सव येथे होतातचैत्रात देवीचे रूप हसरेतर नवरात्रात ते गंभीर असल्याचे सांगितले जातेचैत्रोत्सव देवीच्या माहेरच्यांचातर नवरात्रोत्सव सासरच्यांचा,असे गमतीदार कारणही त्यामागे सांगितले जातेनवरात्रात विविध कार्यक्रम येथे होत असतातदेवीजवळ घट बसवून नवरात्रास प्रारंभ होतोदेवीला रोज वेगळ्या रंगाचे वस्त्र नेसविण्यात येतेतिला अकरा वार साडी लागते. 
चोळीसाठी तीन खण लागतातनऊ दिवस विविध रूपांत पूजा-अर्चा केली जातेनवमीच्या दिवशी होमहवन होऊन दसऱ्याच्या दिवशी पूर्णाहुती दिली जातेत्यानंतर नेवैद्य दाखविला जातोदसऱ्याच्या दिवशी मंदिराच्या शिखरावर ध्वज लावण्याची परंपरा आहेहा मान दिंडोरी तालुक्‍यातील दरेगावच्या पाटील कुटुंबीयांस आहेमात्र ते हा ध्वज कसा लावतात हे कोणालाही समजत नाही.
गडावर सप्तशृंगीच्या मंदिराशिवाय पाहण्यासारखी इतरही काही ठिकाणे आहेतमार्कंडेय ऋषींनी तपश्‍चर्या केलेला डोंगर व कोटीतीर्थ तेथेच आहे.याशिवाय पाण्याची बरीच कुंडे आहेतपूर्वी 108 कुंडे होतीमात्र आता त्यांतील बरीच बुजली आहेतयाशिवाय तांबुलतीर्थकाजळतीर्थ व अंबालतीर्थ ही तीन महत्त्वाची कुंडे आहेततांबुलतीर्थाचे पाणी तांबडे आहेदेवीने विडा खाऊन थुंकला म्हणून हे पाणी तांबडे झाल्याची दंतकथा सांगितली जाते.

माहूरगडची रेणुकादेवी


श्री क्षेत्र माहूरगड एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ते ऐतिहासिक, पौराणिक आणि अतिशय सुंदर नयनरम्य पर्यटनस्थळ म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे. शके 1697मध्ये लिहिल्या गेलेल्या 'श्री रेणुका महात्म्यम्‌' या प्राचीन अप्रकाशित संस्कृत ग्रंथातील श्री रेणुकेचे महात्म्य आणि महत्त्व श्री रेणुकेचे महात्म्य जाणून घेताना सामाजिक जीवनातील त्याचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात येते.
श्री क्षेत्र माहूरगड हे यज्ञकुंडातून प्रगटलेल्या एकविरा देवमाता अदिती साक्षात लज्जागौरी श्री रेणुकेचे पावन क्षेत्र आहे.
सह्याद्रीच्या शिखरावर वसलेले रेणुकामातेचे हे स्थान म्हणजे धार्मिक,ऐतिहासिकपौराणिक स्थळांसोबतच निसर्गदेवतेने प्रगट होऊन आपल्या मुक्त हाताने शुचिर्भूत सौंदर्य आणि मांगल्याने निर्माण केलेला हा कोऱ्या भूमीचा प्रदेश आहे.
  
देवसिद्धऋषी यांचे निवास असलेल्या भागीरथीच्या तीरावार कान्यकुब्ज नावाची प्रसिद्ध नगरी होतीत्या नगरीत धार्मिक सत्यवादी व सर्व शास्त्रांत प्रवीण असलेला इश्‍वाकू नावाचा राजा होता व इश्‍वाकू राजाच्या सद्‌गुणी मुलाचे नाव होते रेणूरेणू राजाने कन्याप्राप्तीसाठी शंकराची आराधना केली.शंकर-पार्वतीला प्रसन्न करून त्यांच्या आशीर्वादाने कन्याप्राप्तीसाठी यज्ञ केला.
त्या यज्ञातून जी तेजस्विनी चंद्रबिंबाप्रमाणे कन्या प्रगटलीतीच एकविरा.अदिती म्हणजेच श्री रेणुकादुष्टांचे निर्दालन करण्याकरिता आणि आपल्या भक्तांचे रक्षण करण्याकरिता रेणुका यज्ञकुंडातून प्रगटली असा ग्रंथात उल्लेख आहेयथावकाश रेणुकेचे स्वयंवर झाले तितकाच तेजस्वी आणि तपस्वी जमदग्नीची रेणुका भार्या झालीजमदग्नीची कथा अशी आहेकी ब्रह्मदेवाचा पुत्र भृगू व भृगू आणि पौलोमी यांच्यापासून च्यवन भार्गव झाला.
ब्रह्मदेवाच्या कृपेने च्यवन भार्गवाला ब्रह्मदेवाचा अवतार असलेला रुचिक नावाचा पुत्र झालारुचिक आणि सत्यवतीचा पुत्र म्हणजेच भृगुकुलोत्पन्न जमदग्नी होयभागीरथीच्या तीरावर रेणुकेचे स्वयंवर झालेजमदग्नी आणि रेणुका दोघेही पतीपत्नी म्हणून भागीरथी तीरावरील महोदय या नगरीत राहू लागले.
सोबत स्वयंवरात इंद्राने दिलेली कामधेनूकल्पतरूतसेच दिव्य चिंतामणी,परीस व सिद्धपादुका सोबत होत्याजमदग्नीला रेणुकेपासून वसूविश्‍वासू,बृहद्‌भानूबृहत्कन्न आणि विष्णुस्वरूप महापराक्रमी परशुराम ही पुत्रे झाली.परशुरामाचा जन्म निशा उजळली असतानाअदिती नक्षत्रावर वैशाख महिन्याच्या तृतीयेला प्रथम प्रहरी सहा ग्रह उंचीचे असताना चंद्रराहूसंगत मिथुनेचा असताना राम नाव धारण करणाऱ्या साक्षात भगवान विष्णूने रेणुकेच्या उदरातून जन्म घेतलापरशुधारी हा महापराक्रमी पुत्र पुढे परशुराम म्हणून प्रसिद्ध झाला.
रेणुकेचे आणखीन एक रूप प्रगट होते आणि ते म्हणजे "लज्जागौरी'चेजेव्हा रेणुकामाता रजस्वाला झाली असतानाचौथ्या दिवशी स्नानाला नदीवर गेली असता स्त्रियांसह नदीवर स्नान करणाऱ्या गंधर्वाला पाहून रेणुकेच्या मनात कामविकारण निर्माण होतो व जेव्हा ही गोष्ट जमदग्नीला कळते तेव्हा ते क्रोधीत होतात व रेणुकेला मृत्युदंडाची शिक्षा देतात व ही शिक्षा आपल्या पुत्रांनी आपल्यासमोर द्यावीअसा आग्रह धरतातएकामागून एक चारही पुत्रांनी रेणुकेचा वध करण्याची पित्याची आज्ञा नाकारताच जमदग्नी त्यांना शाप देऊन ठार करतात. 
पाचवा पुत्र परशुरामास कैलासातून बोलावितात व त्यास आज्ञा करताततुझी आई रेणुका भागीरथी नदीवर स्नानास गेली असता तिने मदनाचे रूप धारण करणाऱ्या गंधर्वाला कामूक भावनेने पाहिलेतेव्हा हे परशुरामा तू या दुराचारिणी व दुष्ट रेणुकेला तत्काळ ठार करपितृ आज्ञा म्हणून परशुराम तत्काळ आपल्या परशुने रेणुकामातेचे शीर धडावेगळे करतोजमदग्नी प्रसन्न होतात.
पितृवचनाचे पालन केल्यामुळे परशुरामास वर मागण्यास सांगतातमातृभक्त परशुराम आपल्या मातेला व भावंडांना पुन्हा जिवंत करण्याची विनंती करतात.जमदग्नीलाही आपल्या क्रोधाचा पश्‍चाताप होतो व ते क्रोधाला कायमचे त्यागून रेणुका व पुत्रांस पुन्हा जिवंत करतात.
या ठिकाणी रेणुकेचे "लज्जागौरीहे रूप प्रगट होतेदुर्गा सप्तशती या ग्रंथात अनुष्ठुप छंदामध्ये एक श्‍लोक आहेतो असा- "या देवी सर्व भुतेषू लज्जारूपेन संस्थीतः नमस्तस्यै नमस्तसै नमस्तस्यै नमो नमःया ठिकाणी तिची पती भक्तिपरायणता लक्षात येतेरेणुकेस पती असूनसुद्धा तिच्या मनात परपुरुषाला पाहून कामविकार निर्माण होतोतिला लज्जेचे महत्त्व असल्याने रेणुका तितक्‍याच धीराने आपल्या पतीने दिलेली मृत्युदंडाची शिक्षा स्वीकारते.
आज समाजामध्ये झालेले नैतिक अधःपतन पाहता सामाजिक व्यभिचार व संस्कृतीच्या नावाखाली विकृती जोपासणाऱ्या स्त्रीत्वाच्या तेजाचा व शक्तीचा विसर पडलेल्या त्या निर्लज्ज स्त्रीपुरुषांच्या डोळ्यांत घालण्यासाठी लज्जागौरी रेणुकेचे हे उदाहरण म्हणजे झणझणीत अंजन नव्हे काय?
वरील घटनेने जमदग्नीच्या मनात क्रोधाबद्दल उद्वेग उत्पन्न होतो व ते क्रोधाला कायमचे त्यागतातदुसऱ्या वेळेस जेव्हा महिस्मावतीनगरीचा राजा सहस्त्रार्जुन शिकार खेळत सैन्यासह जमदग्नी आश्रमासमीप येतोपूर्वी त्याने नारदाकडून या आश्रमाची ख्याती ऐकलेली असते तेव्हा रेणुका व जमदग्नी सहस्त्रार्जुनास आश्रमात भोजनास बोलावितात.
आपल्या सैन्यासह सहस्त्रार्जुन ते निमंत्रण स्वीकारतोपण आश्रमात जमदग्नी व रेणुका हे दोघेच असतानाआपले व सैन्याचे आदरातिथ्य कसे करतील याची माहिती जेव्हा तो आपल्या गुप्तचरामार्फत घेतो तेव्हा त्याला कामधेनू व तिच्या चमत्काराबद्दल कळतेतो जमदग्नीकडे कामधेनूची मागणी करतोपण जेव्हा रेणुका व जमदग्नी कामधेनू देण्यास असमर्थता दर्शवितात तेव्हा जो जमदग्नीवर तलवारीने वार करतो.
रेणुका पतीच्या संरक्षणासाठी धावून जातेक्रोधाचा त्याग केल्यामुळे जमदग्नी आपलेरेणुकेचे व कामधेनूचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतातयामध्ये जमदग्नी ठार होतातवरील जमदग्नीचे क्रोधसहित व क्रोधविरहित रूप पाहता फार मोठा संदेश श्री रेणुकेच्या महात्म्यामुळे समाजजीवनाला मिळतो आणि तो म्हणजे पहिल्या वेळेस क्रोधावर नियंत्रण न ठेवल्यामुळे व दुसऱ्या वेळेस क्रोधाचा मुळीच उपयोग न केल्यामुळे जमदग्नीवर मोठी आपत्ती कोसळते.
जमदग्नी पत्नी रेणुका व पुत्रांना गमावून बसतातक्रोधावर नियंत्रण करणे व योग्य वेळी क्रोधाचा उपयोग करणे या दोहोंचाही जीवनयात्रा सफल करणे व आत्म्याचा विकास करणे यांसाठी उपयोग होतोत्यात ज्याला संतुलन राखता येईलसुवर्ण मध्य साधता येईल त्याचे जीवन दोन्ही दृष्टींने यशस्वी होते.एवढे होऊनसुद्धा रेणुका आपल्या पतीबद्दल व पुत्रांबद्दल तक्रार करीत नाहीया ठिकाणी रेणुकेची क्षमाशीलता हेसुद्धा लक्षात येते.
जेव्हा कैलासात परशुरामास कळतेकी आई रेणुकेवर सहस्त्रार्जुनाने गंभीर एकवीस वार केल्यामुळे ती जखमी झालेली आहे आणि पिता जमदग्नीचा त्याने वध केला आहेतेव्हा आईची हाक ऐकून परशुराम आश्रमात येतो व तिथे प्रतिज्ञा करतोकी आई सहस्त्रार्जुनाचा वध करून त्याच्या रक्ताने तुला स्नान घालील व एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रीय करीनतेव्हा रेणुका पुत्रांस यशस्वितेचा आशीर्वाद देते व म्हणतेप्रथम आम्हा उभयतांची व्यवस्था कर. 
जमदग्नीच्या अग्निक्रियेसाठी जिथे कोरी भूमी आहे तिथे घेऊन चल.जमदग्नीची अग्रिक्रिया श्री दत्तात्रेयाच्या पौरोहित्याखाली रेणुकेच्या सांगण्यावरून परशुरामाने मातृतीर्थास केली तेव्हापासून जगन्माता रेणुकेचा जिथे वास आहेतेच श्री क्षेत्र माहूरगड.

अखिल भारतात शक्तीची जी 51 मूळ पिठे आहेत त्यापैकी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी रेणुकामातेचे हे मूळ पीठ अतिशय शुचिर्भूत भूमी श्री क्षेत्र माहूरगडची कोरी भूमी होय

जगन्माता रेणुका हे असेच जन्मातेचे एकरूप आहेवरील विश्‍लेषणावरून लिंगपूजा व देवीची उपासना आर्यांच्या आधीही सिंधू संस्कृतीत चालत आल्यामुळे देवीची शक्तिपीठे व रेणुका ही अनार्य देवता आहेहे लक्षात येते.
रेणुकेलाच मातंगी हेसुद्धा नाव आहेविष्णुरूप परशुरामाची माता व जगन्माता शिवपत्नी अनादी अनंत आहे व रेणुका हे तिचेच रूप आहेम्हणून श्री रेणुकेच्या रूपात शाक्त आणि वैष्णव या दोन्ही पंथांचा समन्वय आहेअशा तऱ्हेने समाजास आदर्श वाटणारे श्री रेणुकेचे महात्म्य आहे.


ब्रह्मचारिणी - देवीचे दुसरे रूप


ब्रह्मचारिणी 
 ( देवीचे दुसरे रूप ) 


दधाना करपदमाभ्यामक्षमालाकमंडलू।
देवी प्रसिदतु मयि ब्रम्हाचारिण्यनुमत्तमा।।  

नवशक्तीपैकी 'ब्रम्हचारिणी' हे दुर्गेच्या दुसरे रूप आहे. येथे 'ब्रह्म' या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. नवरात्राच्या दुसर्‍या दिवशी या मातेची पूजा केली जाते. या‍ दिवशी साधकाचे मन 'स्वाधिष्ठान' चक्रात स्थिर होते. या चक्रात मन स्थिर करणार्‍याला तिची कृपा आणि भक्ती प्राप्त होते. या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे.

तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असतो. तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला त्यावेळी नारदमुनींने तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती. या तपस्येमुळे या देवीला  त्प्श्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात. 

एक हजार वर्षापर्यंत तिने फळे खाऊन तपश्चर्या केली. उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला होता. या तपश्चर्येनंतर तीन हजार वर्षांपर्यंत केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस काढले. यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला 'अपर्णा' हे एक नाव पडले.

अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते. तिची ही अवस्था पाहून तिची आई मेना खूप दु:खी झाली होती. तिने तिला या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी 'उमा' अगं! नको ग नको! अशी हाक दिली. तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणीच्या पूर्वजन्माचे 'उमा' हे एक नाव पडले. तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडाला. सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले. शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले, की 'हे देवी! आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही. तुझ्या तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे. तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान शंकर तुला पती  रूपात प्राप्त होतील. आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा. लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील.' असा वर त्यांनी दिला. 

ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे. तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते. देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते. अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप आहे.



1 शैलपुत्री


शैलपुत्री ---  
=======
    
दुर्गेचे पहिले रूप 'शैलीपुत्री' या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे.. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला 'शैलपुत्री' असे नाव पडले आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत-महंत आपल्या मनाला 'मूलाधार' चक्रात स्थिर करतात. या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरवात होते. 

या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हाता कमळाचे फूल आहे. आपल्या पूर्वजन्मात तीने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव 'सती' असे होते. तिचा विवाह शंकराशी झाला होता. 

एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते. परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली. तेव्हा शंकराने तिला सांगितले, की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले आहे. 

परंतु, मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही. वडीलांचा यज्ञ पाहणे, तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकूळ झाले होते. तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली.

सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही. तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही. आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट दिली नाही. सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते. नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला. तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले. दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दह‍ी वापरले होते. हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते, असे तिला वाटले. 

आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवर्‍याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वत:ला योगाग्नीत जाळून घेतले. याची माहीती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उध्वस्त केला. सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती 'शैलपुत्री' या नावाने प्रसिद्ध झाली. पार्वती, हेमवती हे तिचेच नाव होते. 'शैलपुत्री' देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली. म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे.

--




सुस्मिता  जोशी  यांच्या सौजन्याने